Income Tax Department- आयकर विभागाचा भुजबळांना दणका

chhagan-bhujbal
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि कुटुंबियांची सुमारे 300 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.बेनामी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागाने भुजबळांना हा दणका दिला आहे .
 भुजबळ गेल्या 14 मार्चापासून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेत आहेत. या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागानं छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना नोटीसा बजावल्या आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून भुजबळ कुटुंबियांची नाशिक आणि मुंबईतली मोक्याच्या ठिकाणची संपत्ती आयकर विभागाने जप्त केलीय.भुजबळांनी 48 बनावट कंपन्यांच्या मदतीनं एवढी मोठी बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती.शेल कंपन्यांची साखळी तयार करून ही मालमत्ता जमवण्यात आली होती असा आरोप यावेळी आयकर विभागाने लावला आहे.
कारवाही चा तपशील थोडक्यात
-जप्त केलेल्या संपत्तीमध्ये नाशिक येथील 80.97 कोटी रुपयांचा गिरणा साखर कारखाना आणि मुंबईच्या सांताक्रूझ येथील बहुमजली सॉलिटेअर इमारतीचा देखील समावेश आहे.हे मिल आर्मस्ट्राँग इंफ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड नावाने तर,इमारत परवेश कंस्ट्रक्शन नावाने होती.इमारतीची किंमत 11 कोटी रुपयांहून अधिक आहे.
-बांद्रा वेस्ट परिसरातील हबीब मानोर आणि फातिमा मानोर या इमारतींच्या किमती 43.61 कोटी रुपये आहे.
-पनवेल येथील एका बेनामी प्लॉटची किंमत 87.54 कोटी रुपये आहे.
-बेनामी संपत्तीची एकूण किंमत 223 कोटी रुपये असली तरीही प्रत्यक्षात त्याची बाजारातील एकूण किंमत 300 कोटींच्या घरात आहे असे आयकर विभागाने स्पष्ट केले.