त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून 2 कोटी, साडेचार किलो सोनं जप्त

नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोन पुरोहितांकडून आयकर विभागाला कोट्यवधीचं घबाड सापडलं आहे.या दोन्ही पुरोहितांकडून 2 कोटींची रोख रक्कम आणि तब्बल साडेचार किलो सोनं आयकर विभागानं हस्तगत केलं आहे. याशिवाय त्यांच्या अनेक मालमत्ता आहेत. त्याचीही चौकशी सध्या सुरु आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. त्यात अनेक व्हीआयपींचा समावेश असतो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतात. सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं, तरी पूजेसाठी कोणत्याही ई-व्यवहाराची सोय नाही.

या दोन्ही पुरोहितांच्या कुटुंबियांचे विविध व्यवसाय आहेत. या कुटुंबातील एक – दोन व्यक्ती पौरोहित्य करतात. तर अन्य सदस्य फर्निचर, गॅस, पत्रे आणि सिमेंटचे वितरक, शेती असे व्यवसाय करतात. नोटाबंदीनंतर या पुरोहितांच्या बँक खात्यांमध्ये मोठी रक्कम भरली गेल्याची चर्चा रंगली आहे. पुरोहितांकडून जप्त केलेल्या रोकडमध्ये नवीन नोटा किती आणि जुन्या नोटा किती हे अद्याप समजू शकलेले नाही.

You might also like
Comments
Loading...