मुंबई : वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी अनेक जण काही ना काही प्रयत्न करत असतात. व्यवस्थित आहार न घेतल्यामुळे आपल्याला वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम आणि चांगला आहार घेणे खूप गराजेचे असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आहारामध्ये सलादचा वापर करावा.
काकडी सलाद –
काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. काकडीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे काकडी, टोमॅटो, आणि कांदा या तीन गोष्टी मिक्स करून त्याच सलाद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे वजन देखील झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
राजमा –
राजमा भातासोबत सर्वच लोक खात असतात. पण राजमाचे सलाद बनवून खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. आणि यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते.
चने –
तुमच्या आहारामध्ये जर तुम्हाला प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करायचा असेल तर तुम्ही चण्यापासून बनवलेले सलाद खाऊ शकता. यामुळे आरोग्य निरोगी राहील आणि वजन कमी करण्यास देखील मदत होईल.
महत्वाच्या बातम्या :