टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये कडाक्याच्या थंडीमुळे केसांना (Hair) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये एक प्रमुख समस्या म्हणजे केस गळती (Hair Fall). पावसाळा आणि उन्हाळ्याच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये केस अधिक गळायला लागतात. त्याचबरोबर या ऋतूमध्ये केस पातळ आणि कोरडे (Dry Hair) देखील दिसायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या आहाराची योग्य रीत्या काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आपण आपल्या आहाराची व्यवस्थित काळजी घेतल्यास केस मुळापासून मजबूत बनू शकतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज या बातमीच्या माध्यमातून काही पदार्थांची नावे सांगणार आहोत. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुमचे केस निरोगी आणि दाट होऊ शकतात.
पालक
हिवाळ्यामध्ये पालकाचे सेवन केल्याने केसांसोबत आरोग्यालाही खूप फायदे मिळू शकतात. कारण पालकांमध्ये मुबलक प्रमाणात आयरन उपलब्ध असते. त्यामुळे केसांमध्ये रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते. परिणामी केस गळती थांबून केस दाट आणि निरोगी राहायला लागतात. योग्य रक्तभिसरण यामुळे थंड हवेचा देखील केसांवर कुठलाही परिणाम होत नाही.
केळी
सुंदर, चमकदार आणि निरोगी केसांसाठी किमान रोज एका केळीचे सेवन केले पाहिजे. तुम्ही केळी फक्त हिवाळ्यात न खाता वर्षभर देखील खाऊ शकतात. कारण केळीमध्ये पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर केळीमध्ये अनेक मिनरल्स आढळून येतात. जे नैसर्गिकरित्या केसांना मॉइश्चराईज करू शकतात. त्याचबरोबर दररोज एक केळी खाल्ल्याने केसांमधील कोरडेपणाची समस्या देखील दूर होऊ शकते.
ब्लूबेरी
झिंग आणि विटामिन सी युक्त ब्लूबेरी आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. हिवाळ्यामध्ये ब्लूबेरीचे सेवन केल्याने केसांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होऊ शकते. केसातील कोंडा आणि पातळ केस या समस्या दूर करण्यासाठी दररोज एक कप किंवा एक वाटी ब्लूबेरीचे सेवन केले गेले पाहिजे.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Mohommad Kaif | Live कॉमेंट्रीमध्ये मोहम्मद कैफने उडवली युजवेंद्र चहलची खिल्ली, म्हणाला…
- Atul Bhatkhalkar | “एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि…”; आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर भाजपाचा टोला
- PM Kisan Yojana | PM किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्डसोबत ‘हे’ डॉक्युमेंट पण करावे लागेल लिंक
- Sanjay Raut | मुख्यमंत्र्यांना शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही – संजय राऊत
- IIFA 2023 | अबुधाबीमध्ये पुन्हा एकदा रंगणार आयफा अवॉर्ड सोहळा, ‘हे’ स्टार्स करणार कार्यक्रम होस्ट