‘शेतीकामांचा मनरेगा अंतर्गत समावेश करा’, आ.अभिमन्यू पवारांचे अजित पवारांकडे साकडे

लातूर: शेतीची मशागत, पेरणी, काढणी व रास करणे इत्यादी कामे मनरेगा योजनेत समाविष्ट करुन मनरेगा अंतर्गत मजुरी देण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आ. अभिमन्यू पवार यांनी केली आहे. शेतकरी आर्थिक संकटात अडकू नये या साठी शेती संदर्भातील कामांना मनरेगा योजनेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्ज काढावे लागते. लहरी पावसामुळे अनेक वेळा पीकांचे अतोनात नुकसान होते. डोक्यावर कर्ज आणि हाती न आलेले उत्पादन यामुळे शेतकरी आत्महत्या सारख्या दुर्दैवी घटना घडतात. शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत अडकू नयेत यासाठी शेतीची मशागत, पेरणी, काढणी व रास करणे इत्यादी कामे मनरेगा योजनेत समाविष्ट करुन शेतकरी व शेतमजूर यांना मनरेगाअंतर्गत मजुरी देण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मनरेगा योजनेत ही कामे समाविष्ट करण्यात आली तर यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी येणाऱ्या खर्चात घट होऊन शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण घटेल, काही प्रमाणात शेतीपासून दुरावलेली तरुण पिढी पुन्हा शेतीकडे वळेल तसेच नापिकीमुळे नेहमी कर्जमाफीची मागणी होते तसेच कर्जमाफीची सुद्धा वेळ येणार नाही, असा विश्वास आ. पवार यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP