Share

Bacchu Kadu | शिवरायांच्या काळातल्या घटनेची तुलना आता करता येणार नाही – बच्चू कडू

Bacchu Kadu | नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. आज (३० नोव्हेंबर, बुधवार) शिवाजी प्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) हे प्रतापगड (Pratapgad) किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतापगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र या कार्यक्रमात बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांची आग्रा तुरुंगातून सुटका झाल्याच्या घटनेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी आणि ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या घटनेशी केली. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या आग्रा घटनेची आता तुलना नाही करता येणार. ते बरोबर सुद्धा नाही, कधी कधी चुकून शब्द निघतात. पण छत्रपतींच्या कार्यासोबत, घटनेसोबत साम्य असू शकते. पण आपण तुलना करु शकत नाही. एखाद्यावेळी चुकून शब्द निघतो. मग मीडिया तोडफोड करुन ते दाखवते, असा प्रकार आहे.”

अमोल मिटकरी यांची टीका –

मंगल प्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले.

आदित्य ठाकरेंची टीका –

आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांना महाराष्ट्र गद्दार म्हणून ओळखतो, ज्यांना महाराष्ट्र खोके सरकार म्हणून ओळखतो त्यांच्यासोबत तुलना महाराजांची करणं, हा काही चुकून आलेला शब्द नाही, हे पूर्णपणे प्लॅन आहे. हे पूर्ण या सरकारचा आणि पक्षाचा प्लॅन आहे की, महाराष्ट्राचे खच्चीकरण करावे. राज्यपाल जे बोलत आहेत. तेच हे मंत्री बोलले आहेत. ही सगळी वस्तूस्थिती लोकांसमोर आलेली आहे. म्हणजे तुम्ही महाराजांची तुलना अशी करता का? हा महाराजांचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे.”

काय म्हणाले लोढा-

आज 363 वा शिवप्रताप दिन (Shiv Pratap Day) आहे. त्यानिमित्त प्रतापगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात  एकनाथ शिंदे यांच्या बंडांची छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्रा सुटकेशी तुलना करण्यात आली आहे. शिवराय आग्रामधून बाहेर पडले तशे शिंदे बाहेर पडले, असे लोढा म्हणाले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसे एकनाथ शिंदे यांनी देखील कोणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले एकनाथ शिंदे महाराष्ट्रसाठी बाहेर पडले, असे वक्तव्य मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Bacchu Kadu | नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानावरुन राज्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. आज (३० नोव्हेंबर, बुधवार) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics