नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचं प्रोत्साहनपर अनुदान
मुंबई : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजात रुपये देणार असा निर्णय सरकाने घेतला होता. ही रक्कम अजूनपर्यंत दिली गेली नाही अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. व लवकरात लवकर दिली जाणार असेही सांगितले होते. आज अर्थसंकल्पात यावर्षी नियमित कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोस्ताहन पर दिले जाणार आहेत. असा आता ठाम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आजच्या अर्थसंकल्पात वचनपूर्ती झाली आहे. याचा फायदा 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी 2022-23 मध्ये 10,000 कोटी खर्च अपेक्षित आहे, असे सांगितले आहे. तसेच भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यापूर्वी दिली होती घोषणा-
यावर्षी नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या –