fbpx

मी विखेंची भेट घेतली पण भाजपात जाण्यासाठी नाही तर त्यांनाचं थांबण्यासाठी ; कॉंग्रेस आमदार

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत, त्यांच्या सोबत कॉंग्रेसचे काही आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे पाटील आणि कॉंग्रेस आमदारांच्या भेटी गाठी सुरु आहेत, दरम्यान बुलढाण्याच्या चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी विखे पाटील यांची भेट घेतली होती, त्याच्या भेटीनंतर राहुल बोंद्रे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेवर आमदार राहुल बोंद्रे यांनी पूर्णविराम दिला आहे.

मी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली हे खरं. मात्र मी भाजपात जाण्यासाठी नव्हे तर त्यांनी काँग्रेस सोडू नये म्हणून मी त्यांची भेट घेतली. असे आमदार राहुल बोंद्रे यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर मी भाजपात जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

दरम्यान, अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपालदास अग्रवाल आणि सुनिल केंदार हे विखेंसोबत भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.