विधानसभेचा निकाल लोकसभेपेक्षा वेगळा असेल ; अशोक चव्हाणांना विश्वास

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही, लोकसभेपेक्षा विधानसभेचा निकाल वेगळा असेल. असा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली, लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभव स्वीकारावा लागला. राज्यात कॉंग्रेसला १ तर राष्ट्रवादीचा ५ जागांवर विजय झाला आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक आवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे, सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

याचदरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच नांदेडचे कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी, विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगल्या जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले म्हणून भारतीय जनता पक्षाने हुरळून जाण्याची गरज नाही. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. विधानसभेचे निकाल लोकसभेपेक्षा वेगळे असतील. असे अशोक चव्हाण यांनी म्हंटले.