fbpx

गद्दारी केली तरी विखेंना शुभेच्छा – सचिन सावंत

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विखेंना टोला लगावला आहे. गद्दारी केली तरी त्यांना शुभेच्छा. शेवटी काँग्रेस महात्मा गांधींची आहे. असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.

विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या अगोदरच त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. विखे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.

विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पक्षाने प्रचंड दिल्यानंतरही पक्ष सोडणारे काही नेते आमदार फोडून पक्ष तोडण्याची भाषा करत आहेत. ही त्यांची मनोवृत्ती दर्शविते. १३४ वर्षांची काँग्रेस पराभवाने संपणार नाही. पुन्हा नव्या उर्जेने, ताकदीने उभारी घेईल. गद्दारी केली तरी त्यांना शुभेच्छा. शेवटी काँग्रेस महात्मा गांधींची आहे. असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.