पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन

narendra modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भाजपच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आले आहे. सत्तेत असणाऱ्या पक्षाचं कायमस्वरूपी मुख्यालय असण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे.

भाजपच्या नवीन मुख्यालयामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. अमित शहा यांनी २०१४ मध्ये भाजपा अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला तेव्हापासूनच सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पक्षासाठी एक नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी कार्यरत होते. आता अखेर या नव्या मुख्यालयाचं काम पूर्ण झालं असून पुढच्या आठवड्यात मुख्यालयात पक्षाच्या कामकाजाला सुरवात होणार आहे.

या नवीन  मुख्यालयाला कॉर्पोरेट लुक, वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र कार्यालयं, मोठी सभागृहं तसेच बैठकींसाठी प्रशस्त खोल्या आणि अत्याधुनिक सुविधांमध्ये टीव्ही कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी स्टुडिओ, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय, मोठं आणि अत्याधुनिक वाचनालयाची सुविधा आहे.