fbpx

आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नीच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेच्या हस्ते होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी यवतमाळमध्ये आज ही घोषणा केली.

जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून पाठवण्यात आलेले निमंत्रण आयोजकाकडून रद्द करण्यात आले होते.सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले असल्याचे आयोजाकडून सांगण्यात आले.त्यानंतर मात्र आयोजक कुणाला उद्घाटक म्हणून निमंत्रित करणार याची उस्तुकता साहित्य प्रेमींना लागली होती. त्यावर मंडळाने सावध पावले उचलले असल्याचे दिसत आहे.