मुंबई: शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानेव यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. होळी संपली आहे त्यामुळे काल जे ते बोलले आहेत कदाचित त्यांना आज ते आठवणार नाही, असं म्हणत खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, रावसाहेब दानवे यांना जीतके मी ओळखतो, तितके ते भांग पीत नाहीत असे मला माहित आहे, किंवा दुसरी कोणती नशा करत नाहीत. रावसाहेब दानवे यांना कदाचित १२५ बोलायचं असेल स्लीप आँफ टंग झाली असेल. होळी संपली आहे कालची नशा उतरली असेल काल काय बोललो हे त्यांना आज आठवणार नाही, असा टोला दणवेंना राऊतांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या: