वर्ध्यात आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित, जिल्हाधिकारी गृहविलगिकरणात

corona

वर्धा : वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असतानाच दोन दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले कोरोनाबाधित आढळल्याने ते कालपासून गृहवीलगिकरणात आहेत. डॉ. डवले यांच्या बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार त्यांच्या समपर्कात आले. त्यामुळे काल सायंकाळपासून आपणही खबरदारी म्हणून गृहवीलगिकरणात पुढील 3-4 दिवस राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार कोरोना उपाय योजनांच्या निमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या संपर्कात आले. काल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवले कोरोना बाधित आले. आपण स्वतः तपासणी केली असून ती नकारात्मक आली.

आपल्यापासून कोणालाही बाधा होऊ नये यासाठी आपण स्वतः गृह विलगीकरण राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे काम घेऊन येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचू नये यासाठी आपण दोन-तीन दिवस गृहवीलगिकरणात राहण्याचा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाधिकारी भीमनवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:-