वैजापूर तालुक्यातील विरगावात अवैध वाळू धंद्यांना उत, कुंपण शेत खात असेल तर जाब मागायचा कोणाकडे?

वैजापूर : वैजापूर तालुक्यातील विरगांव पोलिस हद्दीत अवैध वाळू वाहतूक तसेच विविध अवैध धंदे जोमाने सुरू असून या धंद्यांना उत आल्याने नागरिकांमध्ये आता चर्चेला उधाण आले आहे. जर कुंपण शेत खात असेल तर जाब मागायचा कोणाकडे? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत

वैजापूर तालुक्यातील सर्वाधिक वाळु पट्ट्यांचा भाग विरगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथील अधिकारी हे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांत येथील पोलीस ठाण्यात चार अधिकारी बदलेले पण त्या भागात कलेक्शन करणारे मास्टरमाईंड कर्मचारी तेच आहेत. या कर्मचाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे. त्यामुळे गावात चर्चांना उधाण आले आहे. ठाण्याचे प्रमुख व कर्मचारी सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत.

गोदावरी नदीपात्रातील गंगाथडी भागातून येणारी गावे विशेषतः भालगांव, डागपिंळगांव, पांढरे वस्ती चांदेगांव, नागमठाण, अव्वलगाव, बाजाठाण, आदी भागात सर्रास पणे अवैध वाळू उपसा जोरदारपणे सुरू आहे. यामुळे गोदापात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत. याकडे महसूल व पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. महसूल विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून हे अवैध वाळूचे साठे जप्त करून सरकारचा जो महसूल बुडणार आहे तो वसुल करावा व तसेच हा चाललेला प्रकार थांबवावा, कारवाई करण्याची मागणी गंगाथडी भागातील नागरिकांमधून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या