लोकसभेला आमच्या सोबत नसले तरी विधानसभेला ‘राज’सोबत चर्चा होणार : पवार

टीम महाराष्ट्र देशा – ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. नरेंद्र मोदी व अमित शहा हे देशाच्या हितादृष्टीने घातक असल्याचे सांगत त्यांना हटविण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. लोकसभेला ते आघाडीसोबत नाहीत, विधानसभेला त्यांच्याशी चर्चा होऊ शकते,असे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांची पवार यांनी स्तुती केली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले.

बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या शब्दाला किंमत होती, पण आज ज्यांच्याकडे पक्षाचा कारभार आहे, ते दर १५ दिवसांनी हवामान बदलेल, त्यानुसार धोरण बदलतात असा जोरदार टोला पवारांनी उद्धव ठाकरे यांनी मारला.

भाजपने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली, लोकांनी संधी दिली, पण पाच वर्षांत त्याचे सोने करता आले नाही, त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रातही जनता सत्ता बदल करण्याच्या मानसिकतेत आहे, राज्यात तर आघाडीचीच हवा आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार चार वेळा राज्याच्या दौऱ्यावर यावे लागत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मारला.