आघाडीला खिंडार पाडत देशमुख-ठाकूर जोडीने दिले चंद्रकांतदादांना गिफ्ट

तुळजापूर- तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, नळदुर्ग, सावरगाव या तीन गावातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये आणत आ. सुजितसिंह ठाकुर आणि भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांनी आघाडीला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवडीनंतर हे पक्षप्रवेश होत असल्याने पाटील यांना या दोन नेत्यांनी एकप्रकारे गिफ्ट दिल्याचं बोललं जात आहे.

भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचा हा पहिलाच भाजपा कार्यकता मेळावा होता. यावेळी तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणूक तोंडावर जिल्ह्यात आघाडीला खिंडार पडले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नियुक्ती होण्यापुर्वीच त्याचा दौरा निश्चित ठरला होता माञ दौरा ठरताच त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्याने भाजपा कार्यकतात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी तुळजापूर शहरात सर्वञ कमळ चिन्हे असलेले ध्वज व डिझीटल बँनर लावल्याने तुळजापूर भाजपामय झाल्याचे दिसत आहे.

यांनी केला भाजपात प्रवेश                                                                                                            

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य संतोष बोबडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक तालुकाध्यक्ष विशाल रोचकरी, मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन नारायण नन्नवरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे शहराध्यक्ष संदीप गंगणे, भारत रोचकरी, पञकार गुरु बडूरे, विजय सरडे, उदय जगदाळे, दत्ताञय दासकर, शफि शेख, सुनिल बनसोडे, भाऊसाहेब चोपदार, लिंगायत समाज जिल्हाअध्यक्ष लक्षमण उळेकर, अंड अजली साबळे, अँड गिरीष कुलकर्णी यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.