fbpx

यूपीए सरकारमध्ये अनिल अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायन्सला मिळाली होती १ लाख कोटींची कामं

टीम महाराष्ट्र देशा : राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी रिलायन्स समूह आणि अनिल अंबानी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनिल अंबानी हे ‘क्रोनी कॅपिटलिस्ट’ असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाला रिलायन्स समूहाने रविवारी प्रत्युत्तर दिले आहे.

रिलायन्स समूहाने राहुल गांधींच्या ताज्या वक्तव्यावर म्हटले की, राहुल गांधी करत असलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. ते खोटे आणि बदनामी करणारे अभियान चालवत आहेत. त्यांनी आमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर ‘क्रोनी कॅपिटलिस्ट’ आणि अप्रामाणिक उद्योगपती असल्याचा आरोप केला आहे. जे पूर्णपणे असत्य आहे.

२००४ ते २०१४ दरम्यान यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाला ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, मेट्रो सारखी पायाभूत क्षेत्रातील सुमारे १ लाख कोटींची कामे मिळाली, यावर राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे रिलायन्सने म्हटले आहे