योगी आदित्यनाथांच्या युपीत ६ महिन्यात ४२० एनकांउटर.

yogi adityanath on namaj

उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकार येऊन सहा महिने झाले आहेत.  योगी आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे नेहमीच चर्चेत असतात.  योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पोलीसांना देखील धडक कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत.  आता या निर्णयाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी ८६८ कुख्यात गुन्हेगारांना गजाआड केले आहे.

निर्दोषों को छेड़ेंगे नहीं और दोषियों को छोड़ेंगे नहीं हे आदित्यनाथ यांनी या आधीच स्पष्ट केले होते. गुन्हेगारांना गजा आड करण्याकरीता युपी पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अतंर्गत ४२० एनकांउटर ,१५ इनामी आरोपी तर ८६८ कुख्यात गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्चला शपथ घेतली असून त्यानंतर ४२० एनकांउटर  झाले असून, त्यामध्ये आजमगड,मुज्जफरनगर, सहनापुर या भागातील सर्वाधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ८८ पोलीस जखमी झाले आहेत. एकूण ११०६ आरोपीना अटक करण्यात आली आहे.