उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्रात वाढ – परिणय फुके

टीम महाराष्ट्र देशा : उमरेड-पवणी-कऱ्हांडला या गावांच्या जागेत अभयारण्य क्षेत्र वाढवून या गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करावे असे, निर्देश बुधवारी वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंत्रालयात बैठकीत दिले.

यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेश गीते तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Loading...

यावेळी डॉ. फुके म्हणाले, ‘उमरेड-पवनी-कऱ्हांडला या गावांच्या भोवताली अरण्य परिसर वाढत आहे. परिसरात अभयारण्य वाढल्याने या परिसरातील गावात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. यासाठी काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरित करता येईल. उमरेड, पवनी येथील साधारण ६०५ कुटुंबांचे पुनर्वसन २९५ हेक्टर जमिनीत करता येणार आहे’.

संबंधित गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांचे स्थलांतर करणे गरजेचे असल्याने उप विभागीय अधिकारी ( एस. डी.ओ)नेमण्यात यावा. यासंबंधी पुढील कारवाई करत असताना उमरेड-पवणी-कऱ्हांडला या गावांमध्ये राहत असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतराबाबत अधिसूचना उप विभागीय अधिकारी (एसडीओ) यांनी द्याव्यात. या सूचनांमध्ये गावकऱ्यांना स्थलांतरासाठी संबंधित गावात राहणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अभयारण्य क्षेत्र अधिसूचित करून व कक्षा वाढवून नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे डॉ. फुके यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचा आणखी एक नेता करणार शिवसेनेत प्रवेश

 

पीक कापणी प्रयोगांना शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन : बोंडे

 

#महापूर : ‘गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता असूनही कोल्हापूर – सांगलीमध्ये नियोजनात शून्यता’

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील