राज्य शासन दोन वर्षात ७२ हजार सरकारी पदे भरणार

devendra fadnavis

टीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात 72 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येतील, अशी घोषणा काल विधानसभेत केली.

राज्य सरकारची मेगाभरती

कृषी विभागात – २५००

पशुसंवर्धन – १०४७

मत्स्यविकास – ९०

ग्रामविकास – ११000

आरोग्य – १०,५६८

गृह – ७१११

सार्वजनिक बांधकाम – ८३३७

जलसंपदा – ८२२७

जलसंधारण – २४२३

नगरविकास – १५००

एकूण ३६००० पदं