2017 साली लग्नबेडीत अडकले हे 20 मराठी कलाकार

in-the-year-2017-20-marathi-artists-stuck-in-marriage 2

टीम महाराष्ट्र देशा-  मराठी कलाकारांसाठी हे वर्ष तर अविस्मरणीय ठरले आहे त्याचे कारण आहे त्यांचा विवाह. यावर्षी अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत.

सागरिका घाटगे – ‘चक दे गर्ल’ सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान 23 नोव्हेंबर रोजी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. सागरिका घाटगे कोल्हापूरमधील शाही कुटुंबातील आहे.zaheer-sagrika-weddingप्रार्थना बेहेरे – मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लग्नगाठीत अडकली आहे. दिग्दर्शक आणि लेखक अभिषेक जावकरसोबत प्रार्थनाने 14 नोव्हेंबर रोजी गोव्यात लग्नगाठ बांधली.

Loading...

शशांक केतकर – अभिनेता शशांक केतकर नुकताच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. वकील असलेल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने 4 डिसेंबर रोजी विवाह रचला. सर्वांनाच माहित आहे की हे शशांकचे दुसरे लग्न आहे.

अमेय वाघ – ‘फास्टर फेणे’ फेम अभिनेता अमेय वाघ 2 जुलै रोजी विवाहबंधनात अडकला. बालमैत्रीण साजिरी देशपांडेसोबत अमेयने सप्तपदी घेतल्या. amey_wagh

अभिनय सावंत – निर्मिती सावंत याचा मुलगा आणि अभिनेता अभिनय सावंत नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेल्या 11 डिसेंबर रोजी अभिनयने त्याची मैत्रीण पूर्वा पंडींतसोबत लग्न केलेabhinay_sawant

आरोह वेलणकर – मराठी चित्रपट ‘रेगे’ फेम अभिनेता आरोह वेलणकर 11 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकला आहे. दीर्घकालीन गर्लफ्रेंड अंकिता शिंघवीसोबत आरोहने लग्नाच्या आणाभाका घेतल्या आहेत.

aroh_welankar

विक्रांत शिंदे – ‘दिल दोस्ती दोबारा’ या मालिकेमध्ये पप्या भाईच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा त्याचा साथीदार भपाव म्हणजेच विक्रांत शिंदे याला आता आयुष्याचा साथीदार मिळाला आहे. विक्रांत शिंदे याचा ऑगस्ट महिन्यात साखरपुडा झाला. अस्मिता करंगुटकर हिच्याबरोबर लवकरच तो आता विवाह बंधनामध्ये अडकणार आहे.vikrant shinde

अक्षया गुरव – ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेतील सौम्या म्हणजेच अभिनेत्री अक्षया गुरव 23 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. DOP भूषण वाणी यांच्याशी ती विवाहबद्ध झाली.

akshaya_gurav

अमृता पत्की – मिस इंडियाचा किताब आपल्या नावी करणारी आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पत्की 7 जानेवारी रोजी विवाहबद्ध झाली. जो कानेकर हे तिच्या नव-याचे नाव आहे. पुण्यात अमृता आणि जोचा विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले.amruta_patki

ईशा फडके  ‘ती सध्या काय करते’ या गाजलेल्या सिनेमात मोहिनी ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री ईशा फडके 28 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकली. ईशा फडकेचा हा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी रोजी पुण्यात पार पडला.isha_phadke

मधुरा देशपांडे – अभिनेत्री मधुरा देशपांडेने 5 ऑक्टोबर 2017 रोजी साखरपुडा केला आहे. विशेष म्हणजे मधुराचा नवरा हा सिनेइंडस्ट्रीतील नसून तो व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. मधुरा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

मयुरी वाघ –  झी मराठी वाहिनीवरील अस्मिता या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ 1 फेब्रुवारी विवाहबद्ध झाली. ‘अस्मिता’ या मालिकेतील तिचा जोडीदार असलेला अभिनेता पियुष रानडेसोबत मयुरीने सप्तपदी घेतल्या. mayuri_wagh

सानिका अभ्यंकर – मराठीतील सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेते यांची मुलगी सानिका अभ्यंकर  14 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. साधेपणाने पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला मराठीतील अनेक कलाकारांची उपस्थिती होती.sanika-abhyankar

प्राजक्ता हनमगर – मराठी मालिका आणि कॉमेडी शोजमध्ये झळकणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिचे शुभमंगल झाले आहे. 14 ऑगस्ट रोजी अगदी साध्या पध्दतीने प्राजक्ता विवाहबंधनात अडकली.prajakta_hanmagar

प्रल्हाद कुरतडकर – ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील पांडू अर्थात प्रल्हाद कुरतडकर 27 मे रोजी लग्नगाठीत अडकला. त्याच्या पत्नीचे नाव अंजली कानडे असे आहे.pralhad_kurtadkar

रोहन गुजर – ‘होणार सून मी घ्या घरची’ या मालिकेतील पिंट्या म्हणजेच रोहन गुजर विवाहबंधनात अडकला आहे. अगदी साधेपणाने रोहनने 22 नोव्हेंबर रोजी विवाह केला.rohan_gujar

सचिन देशपांडे – ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मनिष अर्थात अभिनेता सचिन देशपांडेचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. सचिनच्या होणाऱ्या पत्नीचे नाव पियुषा बिद्नुर आहे.

sachin_deshpande

स्मिता जयकर – मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिता जयकर यांनी पुन्हा एकदा विवाह केला आहे. विशेष म्हणजे स्मिता यांनी त्यांचेच पती मोहन जयकर यांच्यासोबतच पुन्हा विवाह केलाsmita_jaykar

विजय आंदळकर – मराठी अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि अभिनेता विजय आंदळकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. 24 नोव्हंबर रोजी या दोघांचा लग्नसोहळा पार पडला.  vijay_andalkar

मनवा नाईक –  अभिनेत्री मनवा नाईक 19 मार्च रोजी लग्नाच्या बेडीत अडकली. निर्माता सुशांत तुंगारेची मनवाने जोडीदाराच्या रुपात निवड केली.manava-naik-wedding

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली