किरीट सोमय्या अंबाबाईच्या मंदिरात; मंदिर समितीने केला सत्कार

किरीट सोमय्या अंबाबाईच्या मंदिरात; मंदिर समितीने केला सत्कार

kirit

कोल्हापूर : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये पोहचले आहेत. दरम्यान काही वेळापूर्वी किरीट सोमय्या यांनी अंबाबाईच्या मंदिर परिसरात जावून अंबाबाईचे बाहेरून दर्शन घेतले आहे. यावेळी मंदिर समितीने त्यांचा सत्कार देखील केला असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच मंदिरातून बाहेर पडताच सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले कि, ‘अंबाबाईकडे प्रार्थना केली आहे कि शक्तीच्या मातेने जसा त्यावेळी राक्षसांचा वध केला होता तसा वध आता भ्रष्टाचार करणाऱ्या राक्षसांचा करण्यासाठी मला थोडी ताकद दे.’ असे साकडे सोमय्या यांनी अंबाबाईकडे केले आहे.

दरम्यान किरीट सोम्मया मुरगूड पोलीस ठाण्यात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आजदुपारी मुरगूडात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मात्र शहरातील सर्व दुकाने व अन्य व्यवहार सध्या सुरळीत सुरु आहेत. स्थानिक पोलीस यंत्रणा या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरु असल्यामूळे बाजारपेठेत फारशी वर्दळ पहावयास मिळत नाही.

महत्त्वाच्या बातम्या