फडणवीसांच्या आकडेवारीत गौडबंगाल?,महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला हल्लाबोल

devandra Fadnavis,

मुंबई : केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार राज्य सरकारमधील नेते करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर आता काँग्रेस नेते फडणवीस यांच्यावर तुटून पडले आहेत.

कोरोनाविरोधात लढाईसाठी केंद्र सरकारने जो निधी महाराष्ट्राला दिला, त्यातूनच राज्याचे सर्व नियोजन करण्यात आले. त्यात राज्य सरकारने एक रुपयाही अधिकचा दिला नाही, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र फडणवीस यांचा हा आरोप धादांत खोटा आहे. कोरोनासाठी केंद्र सरकारने एक छदामही वेगळा दिला नाही. जो निधी दिला, तो दरवर्षी जो नियमितपणे दिला जातो, तोच आहे. त्यामुळे फडणवीस हे राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा पलटवार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राहुल गांधी ड्रामा वरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ‘या’ अभिनेत्रीने सुनावले खडे बोल !

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी द्यावी, असे थेट आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसे केल्यास अधिक स्पष्टता येईल आणि सकारात्मक चर्चा होईल, असेही ते म्हणाले आहेत.

मोदी सरकारच्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेल्या आर्थिक मदतीची यादीच सादर केली होती. मात्र फडणवीसांच्या या दाव्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्री आणि नेत्यांनी आक्षेप घेत हे दावे खोडून काढले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फडणवीसांच्या दाव्यातील फोलपणा उघड केला आहे.

चुकीची माहिती दिल्यामुळे एसटी स्थानकात गर्दी, आता अनिल परब यांना अटक होणार का ?

फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची सविस्तर पोलखोल, चिरफाड अतिशय सोप्या भाषेत महाराष्ट्राच्या जनतेला उद्या सरकारच्यावतीने करुन देऊ, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती पैसा पुरवला याची सविस्तर मांडणी केली. त्याला आता सरकारकडून उत्तर देण्यात येईल”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

#twitter : ‘बोलणाऱ्याची लायकी बघून मी बोलतो’, निलेश राणे आणि रोहित पवार यांची चांगलीच जुंपली