मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात आज 8,992 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
राज्यात आज 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 12 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर पुणे शहरात तब्बल ३१४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८१ हजार २२७ इतकी झाली आहे.
दरम्यान देशात काल 43,393 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 44,291 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्या आधी गुरुवारी 45,892 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 817 बाधितांचा मृत्यू झाला होता. तसेच 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच -अजित पवार
- ‘५५ आमदारात मुख्यमंत्री झाला, ५० नगरसेवकांमध्ये पिंपरी-चिंचवडचा महापौर का होणार नाही?’
- गोकुळ दूध दरात वाढ : गायी-म्हशीच्या दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ !
- पुणे होणार आता ४ च्या काट्याला पूर्णतः बंद ; अजितदादांनी दिले सक्त आदेश
- ईडीकडे केवळ आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? आमच्याकडेही ‘त्यांचे’ पत्ते – संजय राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<