४ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.२७ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक ५२.१५ तर पुण्यात ३४.८१ टक्के

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे, सकाळी उत्साहात सुरू झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत काहीसा ब्रेक लागल्याचं दिसत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार राज्यात ४५.२७ टक्के मतदान झाले आहे. तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक ५२.१५ टक्के मतदान झाले असून पुण्यात केवळ ३४.८१ टक्केच मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून गेले अनेक दिवस केले जात आहे. काही ठिकाणी या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याच दिसत आहे.

Loading...

पुणे लोकसभा मतदारसंघात उन्हामुळे मतदारांचा ओघ कमी झाला आहे. पुण्यात ४ वाजेपर्यंत ३४.८१ टक्के मतदान झाले आहे. तर कोल्हापूरमध्ये ४ वाजेपर्यंत ५२.५१ टक्के सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मतदानाला आतापर्यंत भरगोस प्रतिसाद दिला आहे. तर इतर मतदार संघांमध्ये देखील मतदानाचा टक्का समाधानकारक आहे.

राज्यातील दुपारी ४ पर्यंतचे मतदान

 • कोल्हापूर – ५२.१५%
 • हातकणंगले – ५०.९९%
 • सांगली – ४६.६१ %
 • सातारा – ४४%
 • माढा ४४.१८%
 • पुणे – ३४.१८%
 • बारामती – ४५.३३%
 • अहमदनगर – ४४.४७%
 • जळगाव – – ४४ %
 • रावेर – ४४.७१%
 • जालना – ४९.९०%
 • औरंगाबाद – ४६.९८%
 • रायगड – ४५.६१%
 • रत्नागिरी – सिंधुदुर्ग – ३९ %
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण