मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा अजित पवार यांनी घेतला. तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिला असल्याचे अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
संबंधित यंत्रणांना दिल्या ‘या’ सूचना-
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे,ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी. सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी. कोरोनाची गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात बेडची उपलब्धता व्हावी, यासाठी कोविड रुग्णावर उपचारांसह देखभालीसाठी कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्णालये सज्ज ठेवण्यात यावीत.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे,ती आटोक्यात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देत चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी.सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवताना त्यांच्यावर आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून योग्य प्रकारे उपचार आणि देखरेख करण्यात यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 5, 2022
तसेच उपचारासाठी अत्यावश्यक औषधांचा तुटवडा होऊ नये, त्याचा पुरवठा सुरळीत सुरु रहावा, याची दक्षता घ्यावी. तसंच आरोग्य यंत्रणेत आवश्यक मनुष्यबळासंदर्भात आढावा घेऊन त्यासंदर्भात नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. आरोग्य यंत्रणेनं सज्ज रहावं, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयानं काम करावं. अशा सूचना अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ‘खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- आम्हाला मरणाची परवानगी द्या; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
- “धनंजय मुंडेंचा आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ, हे सरकार नाही तमाशाचा फड”
- सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<