विक्रमी सामन्यात अँडरसनच्या नावावर नोंदवला गेला ‘हा’ नकोसा विक्रम

james anderson

मुंबई : इंग्लंड आणि न्युझीलंड संघादरम्यान ऍजबॅस्टन येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या न्युझीलंडने यजमान इंग्लंड संघाचा 8 गडी राखुन पराभव केला आहे. या विजयासह न्युझीलंडने दोन कसोटी सामन्याची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा हा १६२वा सामना होता. या सामन्यासह तो इंग्लंडकडुन सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडु ठरला. मात्र दुर्दैवाने या सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकारावा लागला. या पराभवासह त्याने इंग्लंडच्या संघाकडुन सर्वाधीक पराभव पाहणाऱ्या खेळाडुंच्या यादीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात अँडरसनने ५६व्या वेळेस पराभवाचे तोंड बघितले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटु अलिस्टर कुकने ५५ पराभव बघीतले होते. या पराभवासह अँडरसनने त्याला जास्त कसोटी सामने खेळण्यासोबत सर्वात जास्त पराभव स्विकारण्याच्या नकोशा यादीतही मागे पाडले आहे.

अलिस्टर कुकने १६१ सामने खेळताना ५५ सामन्यात पराभव स्विकारले होते. त्याच्या पाठोपाठ ऍलेक स्टीवर्टने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत ५३ वेळा पराभूत होणाऱ्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले. सध्या इंग्लंडच्या संघाचा उपकर्णधार आणि अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड याने देखील १४७ सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत ४७ पराभव पाहिले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा देखील कारकिर्दीत ४४ वेळा पराभूत संघाचा सदस्य होता.

महत्वाच्या बातम्या

IMP