मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा आज (28 जून, मंगळवार) आठवा दिवस आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गेल्या सात दिवसांपासून अडचणीत सापडले आहे. अशा स्थितीत 22 जून ते 24 जून दरम्यान ठाकरे सरकारने कोट्यवधी रुपयांचे अध्यादेश आणि प्रस्ताव (Government Resolution-GR) काढले. या सर्व पाश्वर्भूमीवर उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना पाहायला मिळत आहे. उदय सामंत देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान उदय सामंत यांनी राज्यसभा निवडणुकीवर महत्वाच विधान केले आहे.
“राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही ते शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये”, असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
सामना अग्रलेखातून बंडखोर आमदारांवर टीका –
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून टीका केली आहे. मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<