मुख्यमंत्री, जानकर, मुंडे आज एकाच मंचावर; सदाभाऊ करणार शक्तीप्रदर्शन

टीम महाराष्ट्र देशा- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील रयत क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी वारणानगर येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात होणार लक्ष्यवेधी लढत,राजू शेट्टीसमोर असणार सदाभाऊंचे आव्हान

कोडोलीत रयत क्रांती संघटनेचा पहिला वर्धापन दिन आणि ऊस परिषदेच्या निमित्ताने कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंत्री खोत हे हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे वातावरण तयार करण्यासाठी त्यांचे या परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांकडून उमेदवारीचे संकेत मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे.