प्रसाद लाड प्रकरणात राऊत म्हणाले, शाखाप्रमुख उत्तर देईल; पण बोलले मुख्यमंत्री’, भाजपने उडविली खिल्ली

atul bhatkhalkar vs uddhav thackeray

मुंबई : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी माहीममध्ये एका कार्यक्रमादरम्यान केलेलं विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘त्यांना आपली एवढी भिती की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणार. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू’, असं विधान प्रसाद लाड यांनी केलं.

यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी तर संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीच नाही. ‘या विषयावर आमचे स्थानिक शाखाप्रमुख प्रतिक्रिया देतील’, असं म्हणून त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले.

मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. अशी एक झापड देऊत की पुन्हा उठणार पण नाहीत असा इशारा त्यांनी दिला. मात्र, यावरून आता भाजपने शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘प्रसाद लाड प्रकरणात राऊत म्हणाले, शाखाप्रमुख उत्तर देईल; पण बोलले मुख्यमंत्री’ असा टोला आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

गाजलेल्या ‘थप्पड’ प्रकरणात संजय राऊत म्हणाले की उत्तर आमचा शाखाप्रमुख देईल, पण बोलले मुख्यमंत्री. व्यापाऱ्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही ही भाषाही शाखाप्रमुखाचीच. लोकांच्या उपासमारीची, आत्महत्यांची खेद ना खंत. कारण वसुलीमुळे यांची तिजोरी भरून वाहते आहे. किती हा निबरपणा? असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या