सराव सामन्यात टीम इंडियाच्या ‘या’ गोलंदाजाला गवसला सुर

मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपुर्वी सराव सामन्याची मागणी केली होती. बीसीसीआयची ही मागणी मान्य करत ईसीबीने काउंटी इलेव्हन आणि भारतीय संघादरम्यान सराव सामन्याचे आयोजन करण्याचे ठरवले.

या सामन्यात भारतीय फलंदाजीत के एल राहुल आणि रविंद्र जडेजाने धडाकेबाज फलंदाजी करत फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. यासह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज उमेश यादवलाही सराव सामन्यात सुर गवसला आहे. काउंटी इलेव्हन संघाविरुद्ध गोलंदाजी करताना उमेश यादवने भारतीय संघाकडून सर्वाधीक ३ गडी बाद केले आहे. या सराव सामन्यात त्याने १५ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ गडी बाद केले आहे. यात उमेश यादवने ७ षटके निर्धाव टाकली आहेत.

उमेश यादवसह मोहम्मद सिराजने सराव सामन्यात चमक दाखवताना ३२ धावात २ गडी बाद केले आहे. तर जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. यादरम्यान भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत कोरोनावर मात करुन परत आला आहे. त्याच्या पुनरागमनामुळे आगामी सराव सामन्यात मंयक अग्रवालला पुन्हा संघाबाहेर जावे लागु शकते. त्याच्याजागी के एल राहुल सलामीला खेळेल अशी आशा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP