कत्तलीसाठी बैल घेऊन जाणा-या गाड्या ताब्यात; रावेर पोलिसांची कारवाई

crime

जळगाव : रावेरजवळील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेतून रावेर तालुक्यातील पालमार्गे बैल कत्तलीसाठी घेऊन जाणा-या दोन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ४ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.माहितीनुसार, मध्यप्रदेशाकडून रात्री १ वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील पाल येथे जात असतांना गस्तावर असलेले पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह उपस्थितीत जीपची तपासणी करण्यात आली. यात ५ बैल निर्दयीप्रमाणे कोंबून भरून कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आल्याने दोन्ही वाहनावरील चालक फरार झाले आहे.सव्वालाखांचे पाच बैल ताब्यात घेवून त्यांना गौशाळेत पाठविण्यात आले आहे. तर दीड-दीड लाखांचे दोन वाहन जप्त केले असून फरार असलेल्या चालकांविरोधात पोलिस कॉ. सुरेश मेढे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माधव पाटील हे करीत आहे.