अनंत गीतेंची संसदे मधील ओळख ही मौनी खासदार : शरद पवार

ncp shard pawar

टीम महारष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रायगड लोकसभा मतदार संघाला भेट दिली. यावेळी प्रचारसभे मध्ये बोलताना पवारांनी शिवसेनेचे उमेदवार आनंद गीते यांच्या वर चांगलीच खरमरीत टीका केली. अनंत गीतेंची संसदे मधील ओळख ही मौनी खासदार अशी आहे. असे ते म्हणाले.

यावेळी पवार म्हणाले की, अनंत गीतेंना तुम्ही अनेक वर्षे निवडून देत आला आहात आणि मी देखील अनेक वर्ष संसदेत आहे. परंतू तरी देखील अनंत गीतेंची ओळख संसदेतले मौनी खासदार अशी आहे कारण गीतेंनी कोकणच्या प्रश्नांवर कधीचं तोंड उघडलेलं मी पाहिलं नाही.असे पवार म्हणाले. तसेच यावेळी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी देखील कुणबी समाजाचा मुद्दा उचलून धरत अनंत गीते यांना लक्ष केले. तटकरे म्हणाले की, अनंत गीतेंनी कुणबी समाजासाठी आतापर्यंत काहीच केलं नाही, मात्र मी खासदार झाल्यावर चारही तालुक्यात कुणबी भवन उभारणार असल्याच, आश्वासन तटकरेंनी यावेळी दिलं.

दरम्यान रायगड मध्ये आनंत गीते आणि सुनील तटकरे यांची अटीतटीची लढत गेल्या लोकसभेला चांगलीच गाजली होती. गेल्या निवडणुकीत सुनील तटकरेंचा ही निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हे जोरदार प्रचार करून आपला विजय संपादन करू पाहत आहेत.