पंढरपुरात शिक्षिकेचा विनयभंग, एका तरुणावर गुन्हा दाखल

crime-1

टीम महाराष्ट्र देशा – कासेगाव रस्ता परिसरातील एका शिक्षिकेचा तरुणाने विनयभंग केला. सांगोला रस्त्यावरील संत निरंकारी मंडळाच्या गेटसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी सचिन करंडे (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध येथील पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित शिक्षिका (वय ३३) एकच्या सुमारास पायी जाताना संशयित सचिन याने त्यांच्याकडे पाहत छायाचित्र काढले. हे शिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी फोटो काढण्याविषयी विचारल्यावर सचिन याने त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना ढकलून दिले. याप्रकरणी पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.डाॅक्टरला मारहाण : बांधकाम मिस्त्रीसह एकाने भिंती पाडण्यास विरोध करणाऱ्या डॉक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

१४ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता येथील भोसले चौकातील संजीवनी रुग्णालयासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. डाॅक्टर सागर गणपतराव भोसले (वय ३०, रा. भोसले चौक, पंढरपूर) यांना मारहाण झाली. याप्रकरणी विक्रम हेमंत भोसले (रा.भोसले चौक, पंढरपूर) अनोळखी बांधकाम कामगार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालाLoading…
Loading...