ऑनलाईन गेममधून तरुणीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्या तरुणाला अटक

online game

मुंबई : मुंबईमध्ये ‘ब्रेव्ह अँण्ड डेअर’ या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकवून एका १६ वर्षीय तरुणीचे अश्लील छायाचित्र सोशल साईटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण मुळचा गुजरातमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंधेरीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची फेसबुकच्या माध्यमातून गुजरातमधील एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तरुणाने मुलीला ‘ब्रेव्ह अँड डेअर’ गेमच्या जाळ्यात ओढले. हा गेम खेळत या मुलीने आपले अश्लील छायाचित्र तरुणासोबत शेअर केले. मात्र या तरुणाने गैरफायदा घेत ही छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये पोस्ट केली. या घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अंधेरी पोलिसांनी कारवाई करत संबंधित तरुणाला गुजरातमधून अटक केली आहे.

Loading...