पुढच्या सहा महिन्यांनी विरोधक सुद्धा खुप कामे झाली असे म्हणतील : राहुल कुल

दौंड/ सचिन आव्हाड : पुढच्या सहा महिन्यांनी विरोधक सुद्धा खुप कामे झाली असे म्हणतील  असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले. ते दौंड शहरालगत असणाऱ्या मेरगळवाडी वनउद्यानाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले की ,शहरालगत हे वनउद्यान झाल्याने शहरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. वनविभागाच्या अंतर्गत ही योजना राबवून हे वनउद्यान तयार केले असुन यातील पहिल्या टप्प्याचे काम पुर्ण झाले असुन पुढील दूसरा टप्पा ही लवकरच सुरु होउन येथील उर्वरित कामे मार्गी लागणार आहे. वनविभागाच्या अंतर्गत ही योजना राबविन्याची कल्पना ही माझे मित्र उपजिल्हाधिकारी संपत डावखर यांनी सुचवली त्यातून शासनाकडे पाठपुरावा करुन हे वनउद्यान आज तयार झाले आहे. सध्या च्या राज्य शासनात चार भावांच्यात एक मुल असावे अशी माझी स्थिती असल्याने मला तालुक्याच्या कोणत्याही कामासाठी कोणीही नाही म्हणत नाही.

यावेळी प्रेमसुख कटारिया ,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर यांची भाषणे झाली .यावेळी नागराध्यक्षा शितल कटारिया ,लिंगाळी च्या सरपंच सुनिता येडे ,उपसरपंच गणेश जगदाळे ,नगरसेवक राजेश गायकवाड़ ,जीवराज पवार, शाहनवाज पठाण ,नितिन कांबळे, नगरसेविका रेखा सरनोत ,अरुणा डहाळे, पूजा गायकवाड़ वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे आदि उपस्थित होते.

25 वर्ष टोलवाटोलवी केली, पण आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण ? खा. उदयनराजे

मराठा आरक्षण : कायमस्वरुपी टिकणारं आरक्षण आम्हीच देणार