मराठवाडय़ात येत्या 48 तासात अतिवृष्टीः हवामान विभागाचा अंदाज

Rainfall in Maharashtra Weather forecast

औरंगाबाद :  येत्या 48 तासात मराठवाडय़ात  अतिवृष्टी  होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारपासून मराठवाडय़ातील जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच कोकणासह मराठावाडय़ातील काही भागात मान्सून सक्रीय झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात होते. राज्यात दाखल होण्याच्या आधीपासूनच पावसाने मराठवाडय़ात जोरदार हजेरी लावलेली आहे. मराठवाडय़ात सध्या काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.  50 हून अधिक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पूर आल्याने धरणांमधला पाणीसाठा वाढणार आहे.