येणाऱ्या काळात खाम नदीकाठ पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल- पालकमंत्री देसाई

औरंगाबाद : खाम नदी पुनरूज्जीवन विकास प्रकल्पाचे माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची शुक्रवारी (दि.११) शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पायी फिरून पाहणी केली. आत्तापर्यंत झालेल्या कामाचे कौतुक करून खाम नदीकाठ चांगला आणि सुंदर पिकनिक स्पॉट म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एजन्सी, स्थानिक संस्था व नागरिकांना सोबत घेऊन चांगले काम करत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

पालक मंत्री सुभाष देसाई आज औरंगाबादेत आढावा बैठकीनिमित्त आले असता त्यांनी ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या कामाला भेट दिली. कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी कामाचे कौतुक केले. झालेले काम अभिमान वाटावा असेच आहे येणाऱ्या काळात खाम नदी पर्यावरण व पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे असून खाम नदीच्या काठावर चांगले आणि सुंदर पिकनिक स्पॉट होईल.

खाम नदी विकासाचे काम अभियानाची बाब आहे. या कामाला आपण भेट देत राहणार असल्याचे सांगून यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली करून काही सूचना केल्या. खामनदी विकासाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन कौतुक केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, शहर अभियंता एस.डी. पानझडे आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP