‘जिवंत’ पत्नींच्या नावाने १६० नवऱ्याने घातले श्राद्ध

पतीकडून पत्नीचा छळ होतो त्याचा प्रमाणे पत्नीकडून सुद्धा छळ होत असतोय, त्यामुळे पुरुषांचासाठीही महिलांप्रमाणे आयोग असावा, अशी मागणी भाजपचे खासदार हरिनारायण राजभर यांनी ३ ऑगस्टला संसदेत केली होती. यावर लोकसभेतले सगळे खासदार हसले होते, पण राजभर यांचे समर्थकही आहेत! १६० पुरुषांनी अलीकडेच त्यांच्या घटस्फोटित ‘जिवंत’ पत्नींच्या नावाने श्राद्ध घातलंय!

स्त्रीवादाच्या राक्षसाचा सामना करण्यासाठी या पुरुषांनी हा विधी केला आहे. सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशन (SIFF) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून देशभरातल्या विविध ठिकाणच्या या १६० पुरुषांनी गंगेकाठी त्यांच्या माजी पत्नींच्या नावे पिंडदान आणि श्राद्ध केलं. आपल्या लग्नाच्या वाईट आठवणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे विधी करण्यात आले. ‘पिशाच्यिनी मुक्ती’ ही एक तांत्रिक पूजा असते, तीही यावेळी करण्यात आली.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...