कोम्बिँग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी घरात घुसून केली मारहाण

aurangabad bhapkar

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना देखील घडल्या त्यामुळे आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरम्यान, मिटमीटा भागात पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आम्हाला अटक करा अथवा अटक केलेल्या गावकऱ्यांना सोडा अशी मागणी करत मिटमीटाभागातील नागरिकांनी आयूक्तालयात ठिय्या मांडला.

कोम्बिँग ऑपरेशनच्या नावाखाली नागरिकांच्या घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली होती. आमच्याच भागात कचरा का? अश्या विचारपूस करणाऱ्या तरुणांना अटक केली होती त्यांच्या वरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली. इतकी मोठी घटना घडली आणि अधिकारी एसी रूम मध्ये बसून आहेत. नागरिकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन मुंबई ला घेऊन जाऊ, असा इशारा एमआयएम चे आमदार इम्तियाज जलील यांनी दिला. जे झाले ते दुख:द असून ज्या अटक झालेल्या तरुणांची परीक्षा बुडाली आहे त्यांना परीक्षा देण्याची सोय करू असे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहे.