fbpx

मावळ मतदार संघात पार्थ पवारांकडून भेटीगाठी सुरु

टीम महाराष्ट्र देशा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार म्हणून जोरात चर्चा सुरु आहे.

त्यातच पार्थ पवार यांनी या लोकसभा मतदार संघात भेटीगाठी घेत आढावा घेतला. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी मोरया गोसावी गणपतीची आरती केली. त्यानंतर शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटून आढावा घेतला.

शहरात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर पार्थ यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. मोरया गोसावी चरणी लिन होऊन पार्थ यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्री गणेशा केल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दरम्यान, आपण पक्षाचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पार्थ यांच्यासोबत माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, नगरसेवक नाना काटे, संदीप पवार तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.पार्थ यांनी शहरात दौरा सुरू केल्याने त्यांची मावळ मतदार संघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.