महावितरण कंपनी तोट्यात, तुमच्या खिशाला लागणार कात्री

 टीम  महाराष्ट्र देशा : महावितरण कंपनीमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण मागील दीड वर्षात महावितरण कंपनी तोट्यात सापडली असून तब्बल 30  हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे आणि आता हा तोटा भरून काढण्यासाठी महावितरण ग्राहकांच्या खिशाला हात घालणार आहे.

महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.  कंपनीकडे वीज उपलब्ध आहे पण खरेदी करायला खरेदीदारचं नसल्यामुळे हा सगळां सावळा गोंधळ झाला आहे.

परिणामी महाराष्ट्रातील आजवरची सगळ्यात मोठी वीजदरवाढ करण्याची मागणी कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे. महावितरणला 2018 च्या सहा महिन्यात ग्राहकांच्या खिशातून 15 हजार 714 कोटी आणि 2019-20  वर्षात 15 हजार 128 कोटी रुपये वसूल करायचे असून याबाबत कालच असा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला सादर झाला. सध्या खुल्या बाजारात 2 रुपये 50 पैसे दरानं वीज उपलब्ध आहे मात्र महावितरणच्या विजेचा दर किमान 4 रुपये असल्यामुळे,  त्यामुळे अनेक मोठे औद्योगिक ग्राहक, रेल्वे यांनी महावितरणला रामराम ठोकलाय.

पंतग जरा जपून उडवा- महावितरण

Rohan Deshmukh

महावितरणच्या मोबाईल ॲपला २७ लाख ग्राहकांची पसंती

थकित वीज बिलासाठी नगर जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा तोडला

Latur Advt
You might also like
Comments
Loading...