मागील 3 वर्षांमध्ये भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर : केंद्रात व रायात भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केंद्र व राय सरकारचे गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या विरोधातील असलेले धोरण यांसह ढिसाळ प्रशासनासह कोणतेही विकास कामे होत नसल्याने भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाबाबत बोलतांना ते म्हणाले की,सरकारच्या मागील ३ वर्षांच्या काळात संपूर्ण जनता असमाधानी आहे. कोणतेही ठोस काम,शेतीमालाला भाव नाही.सरकारने सोयाबीन पिकाची खरेदी केलेली नाही.कांदा व तूर या पिकांबाबत हीच परिस्थिती आहे.उलट पेट्रोल व डिझेलचे भाव खूप वाढवून ठेवले आहेत.या सरकारची प्रशासनावर कोणतीही पकड नसल्याने मागील ३ वर्षांत शेतक-यांना वीज बिले सुध्दा दिले नाहीत.आणि आता थोडेफार पीक पाण्याचे दिवस आले तर सर्वत्र अचानक वीज कट केली आहे.अगदी महानगरांमध्ये ही भारनियमन असून सर्वत्र वीजेचा खेळखंडोबा झाला आहे.काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली असतांना साधा पंचनामा सुध्दा केला नाही.मागील ३ वर्ष हे विविध मोर्चाचे वर्ष राहिले.अनेक संप,आंदोलने या सरकारच्या काळात झाली. सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच-खड्डे निर्माण झाले असून अडीच लाख कोटी रुपये कर्ज उभारले ते गेले कुठे हा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

या उलट काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आता जनतेला नक्कीच काँग्रेसच्या कारभाराचे कौतुक वाटत आहे.कर्जमाफीबाबत मोठा गोंधळ झाला असून मोठ्या जाहिराती नंतर कुणालाही कर्जमाफी मिळाली नाही, अजून सरकारला कर्जमाफीचा झालेला गोंधळ कळाला नाही.

मागील ३ वर्षांत भाजपाने शिवसेनेची खूप अवहेलना केली असून स्व. बाळासाहेब ठाकरे यांची कायम जनतेच्या बरोबर राहण्याची भुमिका ठेवली होती मात्र खूप अवहेलनानंतही सध्याची शिवसेना ही सत्तेबरोबर राहत आहे.देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीमध्ये आपल्याकडे १८२ उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी असून गुजरातमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना उदंड प्रतिसाद भाजपाने विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातला पुढे केले परंतु जीएसटी,नोटाबंदी,घसरलेला आर्थिकदर यामुळे आर्थिक मंदीसह व्यापार व प्रगती मंदावली आहे.

जनतेत तिव्र नाराजी असून काँग्रेसला या निवडणूकीत नक्कीच मोठे यश मिळणार आहे.कन्हैय्या कुमार यांना विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे.लोकशाहीत विचार मंथन झालेच पाहिजे परंतु सर्वत्र मुस्काटबाजी केली जात असल्याची टीका ही त्यांनी भाजपावर केली

You might also like
Comments
Loading...