fbpx

महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोंढवा दुर्घटनेतील तिघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

पुणे – अवघा महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या कोंढव्यातील दुर्घटनेत १५ बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ३ आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तिघांनाही मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला असून पुढील सुनावणी ३० जुलैला होणार आहे.

कांचन डेव्हलपर्सचा मालक पंकज व्होरा, भागीदार सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. याआधी अल्काॅन बिल्डरच्या दोघांना अटक झालेली आहे. अल्कोन स्टायलश सोसायटीची इमारत बांधणाऱ्या विकासक विवेक अग्रवाल आणि विपुल अग्रवाल, अशी त्यांची नावे आहेत. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.’अ‍ॅल्कॉन लँडमार्क्‌स’ रजिस्टर संस्थेचे भागीदार बिल्डर जगदीशप्रसाद तिलकचंद अगरवाल (वय ६४), सचिन जगदीशप्रसाद अगरवाल (वय ३४), राजेश जगदीशप्रसाद अगरवाल (वय २७), तसेच कांचन रजिस्टर संस्थेचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह त्यांचे साइट इंजिनीअर, सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक सागर काळे (वय २८) यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.