टी-२० संघाचे नेतृत्वपद मिळवण्यासाठी ‘हे’ २ क्रिकेटर शर्यतीत, रोहितला देणार टक्कर 

rohit

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू व संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. विराट कोहलीने ट्विटरवरून टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर T20 टीमचे कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती दिली आहे.

विराट कोहलीने T20 विश्वचषक स्पर्धा तोंडावर आलेली असताना कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं आणि क्रिकेट जगतात खळबळ उडाली. विराटने स्वतःला थोडी स्पेस देऊ इच्छित असल्याचं सांगत T20 टीमचं कर्णधारपद सोडणार असल्याचं स्पष्ट केलं. विराटनंतर टीम इंडियाचं नेतृत्व उपकर्णधार म्हणून कार्यरत असलेल्या रोहित शर्माकडे येणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माचे नाव  जरी आघाडीवर असले तरी त्याला युवा खेळाडूंकडून याबाबतीत रोहितला आव्हान मिळू शकते.

T20 कर्णधारपदासाठी रोहित ऐवजी केएल राहुलचा विचार होऊ शकतो. राहुलने आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्येही त्यानं चांगली बॅटींग केली आहे. तो आयपीएल, वन-डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे, त्याला कॅप्टन केले जाऊ शकते.’राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्स टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनसीचा प्रभाव त्याच्या बॅटींगवर पडलेला नाही.

राहुल नंतर अजून एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे रिषभ पंत. भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंत खेळतो. रिषभ पंत हा भारतीय संघात महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक मानला जातो. रिषभने प्रत्येकवेळी आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं आहे. तसेच आयपीएलच्या यंदाच्या मोसमात श्रेयश अय्यरच्या गैरहजेरीत दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारले आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात उत्तम कामगिरी केली तसेच या मोसमात ८ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला. रिषभचे वय सध्या कमी आहे तरी देखील तो तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमित यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळतो आहे. जर पुढील अनेक वर्षांचा विचार करायचा झाल्यास पंत एक चांगला पर्याय ठरु शकतो.

महत्त्वाच्या बातम्या