fbpx

ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार, नेत्यांची डोकेदुखी वाढली

बीड : बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातुन जवळपास 690 छोट्या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका 7 ऑक्टोबर रोजी होत आहेत. अनेक गावात एकाच पक्षाचे दोन दोन उमेदवार उभे राहिले असून त्यातील कोणत्या पैनल ला साथ द्यायची याचा संभ्रम सध्या आमदार, नेत्यांमधे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेत्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

थेट जनतेतुन सरपंच निवडून देण्याची ही पहिलीच निवडणुक आहे त्यामुळे सत्ताधारी त्याचबरोबर विरोधकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळी बरोबर राज्य स्तरावर देखील हालचालीना वेग आलेला पाहायला मिळत आहे. विरोधक स्थानिक समस्या रस्ते, पाणी योजना, शालेय व्यवस्था अशा अनेक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. मतदानाला अवघे काही दिवसच शिल्लक रहिल्यामुळे प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळत आहे.