Share

IND vs BAN | पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहित, जडेजा आणि शमीच्या जागी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली आहे. ही मालिका बांगलादेश संघाने 2-1 ने आपल्या नावावर केली आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. 14 डिसेंबरला या मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघामध्ये अनेक बदल दिसले आहे. कारण भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर रोहित मायदेशी परतला आहे. मुंबईला परतल्यानंतर रोहितने तज्ञांची भेट घेतली आहे. डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये अनुपस्थित राहणार आहे. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वर (Abhimanyu Ishwar) ची निवड करण्यात आलेली आहे.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अद्यापही त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. तर, दुसरीकडे भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohommad Shami) देखील त्याच्या खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यात अनुउपस्थित राहील. या दोघांच्या जागी भारतीय संघामध्ये नवदीप सैनी आणि सौरभ कुमारची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या कसोटी सामन्यांमध्ये निवड समितीने वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकरचा ही संघात समावेश केला आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व के. एल. राहुल सांभाळणार आहे. तर, या कसोटी मालिकेमध्ये भारतीय संघामध्ये शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनाडकट या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now