हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या मुहुर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे अनावरण केले. तद्पश्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagawat) यांनी या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली. तसेच पहिल्या क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित, असे भागवत म्हणाले.
यावेळी बोलत असतांना मोहन भागवत म्हणाले की,‘पहिला क्रमांकावर हिंदू हित म्हणजेच राष्ट्रहित’, तसेच माझे स्वतःचे हित, माझ्या कुटुंबाचे हित, माझ्या भाषेचे हित, माझ्या जातीचे हित, माझ्या प्रांताचे हित, माझ्या पंथाचे हित, हे नेहमीच दुसऱ्या स्थानावर आहे, असेही भागवत म्हणाले. पुढे ते म्हणाले की,‘आपण स्वाभिमानाने जगू आणि विश्वाचे पालनपोषण करू. तसेच हजारो वर्षातही आपल्याला कोणीच मिटवून टाकू शकले नाही. ज्यांना आमचा नाश करायचा आहे ते पोकळ होत आहेत’, असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलत असतांना ‘शंकराचार्यानंतर रामानुजाचार्यांनी मोठे काम केले आहे. शंकराचार्याने सर्व मतमतांतरे एकत्र करून देशाला एकत्र केले तर रामनाजुचार्यांनी जीवन कवनाने सर्व देशाला सनातन धर्माशी जोडण्याचे काम केले. फक्त इतकेच नाही तर कुरिवाज, कुप्रथा त्यांनी आपल्या कर्माने बदलल्या’, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Lakhimpur Kheri violence : शेतकर्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला मिळाला जामीन
- अमरावती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सोमवारपर्यंत काम बंद आंदोलन
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
- अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्रांती चौकातील पुतळा अनावरण साठी सज्ज
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<