अक्षय कुमारचा नाशिक दौरा वादात, भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

akshaya kumar

नाशिक – अभिनेता अक्षय कुमार यांनी तीन दिवसांपूर्वी केलेला नाशिक दौरा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. मार्शल आर्ट अकॅडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याबाबत अक्षय कुमार यांनी नाशिक येथे भेट देत माहिती घेतली. या दौऱ्या दरम्यान ते त्र्यंबक येथील एका रिसोर्टमध्ये मुक्कामीदेखील होते. मात्र, आता अक्षय कुमार यांचा हा दौरा वादात सापडणार आहे.

कोरोना संकटकाळात हॉटेल, रिसोर्टस तसेच जिल्हा सीमाबंदी असताना आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून सर्व मंत्री चारचाकीने दौरे करत असताना अक्षय कुमार यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी कशी दिली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या दौऱ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर नाशिकमध्ये आले, त्यास परवानगी कोणी दिली. विशेष म्हणजे, सध्या सगळे मंत्री, व्हीआयपी हे कारने प्रवास करत आहेत. तरीही, अक्षयकुमारला हेलिकॉप्टरने प्रवास करण्यास परवानगी कोणी दिली?, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.

मग, शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला, याशिवाय एक्स्कॉर्ट का पुरवला ? असा प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करावा, असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.

…अन् भाजपचे नाराज नेते राम शिंदे आणि रोहित पवार आले एकत्र

पुणे दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

निरमाच्या जाहिरातीमधून अक्षय कुमारवर मराठा शासकांचा अवमान केल्याचा आरोप